This organization works partially with the system of sponsored collaborations. It works its partners for various activities rather than structured projects. These activities can be said to form projects. These include the following activities:
- Imparting newer technology in Farms.
- Activities related to watershed development.
- Cow based product development.
- Bibba Project.
- Training sessions and workshops.
- Activities related to Self Help Groups.
जल संधारणाचे प्रयोग
- संस्था कार्य करीत असलेली सर्व गावे डोंगरमाथ्यावरील आहेत, त्यामुळे वरून पडणारे पावसाचे पाणी हे एकाच स्त्रोत गावांना पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. वैशिष्ट्यपूर्ण भूगर्भ रचनेमुळे पाणी जमिनीत मुरावण्यावर खूपच मर्यादा आहेत. या बाबी लक्षात घेवून २० गावातील १५० विहिरींची भूस्ताराची सर्व माहिती सर्वे द्वारा गोळा केली. या कार्यात जीओफोरम हि संस्था आणि पी.एस.कुलकर्णी यांनी हि सर्व माहिती नकाशामध्ये परावर्तीत केली.
- संस्थेच्या सहकार्याने खंडाळा गावातील एका नाल्यावर तेथील शेतकर्यांनी दोन वनराई बंधारे बांधून पूर्ण केले.
- बोधवाद या गावात गणेश गव्हाणे या शेतकर्याने टेकडीवरून वाहणारे सर्व पाणी त्याच्या विहिरीकडे वळवून विहीर पुनर्भरण केले.
- करीशी खात्याच्या सहकार्याने ५ गावांमध्ये ८ शेतकर्यांनी ३३ मी ची शेततळी तयार केली. ६ शेतकर्यांनी माती नाला बांधून पूर्ण करून घेतले.
- संस्थेने खंडाळा, बोधवड व हळदा गावात पर्जन्यमापक ठेवून पावसाच्या नियमित नोंदी ठेवल्या.
- शेतकऱ्यांमध्ये यामुळे जागृती निर्माण झाली. पूर्ण पावसाळ्यात किती मी मी पाऊस झाला आणि किती पाणी जमिनीत मुरले याचा अंदाज बंधू शकतात.
प्रशिक्षण
- शेण आणि गोमुत्राचे महत्व दाखवून देण्याच्या उद्देशाने संस्थेने ७ शेतकर्यांना गौ आधारित वस्तू निर्माण विधी शिकवण्यासाठी नागपूर जवळील डेवलपर यथे गो विज्ञान अनुसंधान केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविले.
- संस्थेमार्फत गोपूळ ता. गंगापूर येथे सुधीरजी विद्वांस यांच्या शेतावर गौ आधारित वस्तू निर्माण प्रकल्पाची सुरुवात केली.
- शेण आणि गोमूत्रापासून १० वस्तू बनविण्यास प्रारंभ.
- मे महिन्यात २ प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले.
- संस्थेने पिंपळदरी येथील शेतकरी आणि तरुणांसाठी जमीन मोजणीचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणास ४५ शेतकरी आणि १२ तरुण उपस्थित होते. संतोष बडक या कार्यकर्त्याने जमीन मोजणीचे प्रशिक्षण घेतले होते. त्याला संस्थेने काही साधनांची मदत आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले. तो आज या परिसरातील जमीन मोजणारा म्हणून ओळखला जातो.
- पुण्यातील रघुनंदन वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जैवविविधता पाहणीचे ९ कार्यकर्त्यांना प्रशिक्षण. यामुळे १० गावांचे सर्वेक्षण पूर्ण केले.
गांडूळखत प्रकल्प
- संस्था गेल्या ३ वर्षापासून सिल्लोड परिसरातील हळदा आणि जवळच्या पाच गावांमध्ये झाडाखालील गांडूळखत हा प्रयोग राबवत आहे.
- मागील २ वर्षात २०० शेतकर्यांनी हे प्रयोग आपल्या शेतात केला. मागील वर्षात कमी पावसामुळे याचे प्रमाण घटून ५० शेतकरी आजही व्यवस्थित गांडूळखत बनवून उपयोग करीत आहेत. याशिवाय या सर्व ५० शेतकर्यांना गांडूळखत वापर प्रशिक्षण देण्यात आले.
- आगामी काळात हा प्रयोग पुन्हा पूर्वीच्या २०० शेतकर्यांना पर्यंत नेण्याचा प्रयत्न संस्था करणार आहे.
नर्सरी प्रकल्प
- संस्थेने खंडाळा व बोधवड गावात नर्सरी उभारणीसाठी संभाजीनगर येथे नर्सरी प्रशिक्षण घेतले. याचा लाभ ८ महिला व ५ पुरुषांनी घेतला. याचे परिणाम स्वरूप या दोन गावात ४ महिला बचत गटांनी सामाजिक वनीकरणाच्या सहकार्याने ४ नर्सरी उभारल्या. प्रत्येकी १० हजार रोपांची एक अश्या ४ नर्सरी उभारल्या.
- दोन नर्सरी आजही उत्तम स्थितीत चालू आहेत. यामुळे संस्था १० हजार बिब्याच्या रोपांची लागवडीचे लक्ष्य गाठू शकेल.
कुक्कुट पालन प्रशिक्षण
- संस्थे तर्फे औरंगाबाद येथे ७ दिवसाचे प्रशिक्षण ३ गावातील ७ शेतकर्र्याना देण्यात आले.
- या पैकी एक श्री भागवत चव्हाण (खंडाळी गाव) या प्रशिक्षनार्थाने आज स्वतच्या ५०० देशी कोंबड्याचे कुक्कुट पालन करण्याची इच्छा असणार्र्या शेतकार्र्याना मार्गदर्शन करत आहे.
- सध्या संस्थेतर्फे ४ पुरुष आणि ३ महिला बचत गट चालू आहे.
- कार्यक्षेत्रातील अनेक बचत गटांना आवश्यक ते मार्गदर्शन.
- या वर्षी ५० बचत गट स्थापन करण्याचे ध्येय.
मेळावे व कार्यक्रम
- सहा गावात दरवर्षी गुडीपाडवा उत्सव साजरा.
- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला प्रयत्न करून ५० ते ६० महिलांची उपस्थिती वाढवली.
- १०० शेतकर्र्याना बागेसाठी प्रोत्साहन आणि बियाणे पुरविले.